Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Tune in to 117th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 29th December 2024

Tune in to 117th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 29th December 2024

Read
Comments closed for this talk.
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 9 months ago
मी हे मागेही लिहून पाठविलं होतं, पर्यावरण रक्षणासाठी म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ही सहजतेने आणि सुलभतेने उपलब्ध व्हावी, सर्वसामान्य नागरिक कमी वेळ आणि कमी खर्चात प्रवास करण्यास मिळत असेल तर जास्तीत जास्त नागरिक स्वतःची वाहनं वापरणं बंद करतील, यामुळे वाहतूक कोंडी, अनाठायी खर्च होणारं इंधन आणि पैशांचा खर्चही कमी होईल, याद्वारे आपल्याला इंधन आयातही कमी करता येईल, याबरोबरच जर आपण सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी, उच्चाधिकारी, राजकीय नेते यांना शासनातर्फे आणि आपल्या ठरलेल्या वेगवेगळ्या कायद्यांनां व नियमावलीस अनुसरून काही जणांनी सार्वजनिक वाहनं वापरावीत तर काही जणांनी दोन, तीन, चार जणं एकत्र असा प्रवास करण्याची विनंती केली गेली तर बऱ्याच प्रमाणात पर्यावरण प्रदूषण कमी होईल आणि त्याबरोबरच इतर सर्व गोष्टी म्हणजे वाहतूक कोंडी, अनाठायी खर्च होणारं इंधन आणि पैशांचा खर्चही कमी होईल, याद्वारे आपल्याला इंधन आयातही कमी करता येईल, हे सर्व आपोआप कमी होण्यास मदत होईल, उर्वरित दोन मध्ये -
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 9 months ago
     शपथ ग्रहण सोहळे, अवाजवी, गरज नसलेले सुमार असे म्हणजे नुसता गाजावाजा करणारे शासकीय सोहळे आणि त्यांवर होणाऱ्या जनतेकडून घेतलेल्या करांच्या पैशांची उधळण कितपत योग्य वाटते, याबरोबरच जनतेच्या अमुल्य अशा कामांचे व्यर्थ जाणारे करोडो तास याचा विचारही व्हावा,      एखादा जरुरीचाच सोहळा करावयाचा असेल तर त्यात या कार्यक्रमांतर्गत प्रेक्षकांसाठी जसा नाट्यप्रयोग, चित्रपट, कसरती वगैरें दाखवावं, पण तो धांगड धिंगाणा ही नसावा,       निवडणूकीत सर्व निवडून येणाऱ्या सदस्यांना ते त्या ठिकाणी कार्यरत असे पर्यंतच मेहनतांना सुद्धा ठराविक मर्यादेपर्यंतच देण्यांत यावा तो अवाजवी नसावा,      ही सर्व नेते मंडळी कोणत्याही सरकारचे शासकीय कर्मचारीही म्हणून गणले जात नाहीत किंवा नसल्यामुळेच त्यानंतर त्यांना कोणत्याही स्वरूपात पेंशन, इतर अवाजवी भत्ते वगैरें देण्यांत येऊ नयेत,        समजा जर अगदी पेंशन द्यावयाचेच असेल तर त्या सर्व नेते मंडळींना EPFO च्या नियमांच्या कक्षेत आणून खाजगी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तक्त्यांत बसवून त्याप्रमाणातच पेंशन देण्यांत यावं इतर कोणत्याही प्रकारचे भत्ते तर अजिबातच देऊ नयेत,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 9 months ago
नेते मंडळी भाग दोन -      डिसेंबर 2024 च्या पहिल्याच आठवड्याच्या वर्तमान पत्रात वाचण्यात आलं की एक ज्येष्ठ सन्माननीय खासदार फक्त तीन मिनिटं उपस्थित होते असं त्यांनीच सांगितलं असं पेपर मध्ये आहे नंतर ते फुकटचं जेवण घेऊन निघूनही गेले, आता त्यांची उपस्थिती गणली जाणार व पूर्ण मोबदलाही घेणार अशी जनतेकडून वसूल केलेल्या करांच्या पैशांची उधळपट्टी कितपत योग्य आहे आणि या समस्त गोष्टीं सर्वसामान्यांप्रमाणे म्हणजे त्यांच्या जागी आपण आहात असा विचार करून निर्णय घ्यावा,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 9 months ago
नेते मंडळी भाग एक संसद, राज्यसभा, विधान भवन, विधान परिषद वगैरें वगैरें निवडून येणारे प्रतिनिधींच्या रोजच्या कामांच्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे, सर्व निवडून दिलेल्या जनतेच्या प्रतिनिधींनीं पूर्ण वेळ कामकाजात भाग घ्यायला हवा, ते जितके तास किंवा दिवस उपस्थित असतील तितकाच मोबदला दिला जावा, त्यांची अनुपस्थिती ही सर्वसामान्य लोकांप्रमाणेच बिन पगारी म्हणजे एकही पैसा न देता गणली जावी,       सभागृहाचं कामकाज हे ठरलेल्या नियमांनुसार आणि कालावधी पर्यंत चालणे गरजेचे आहे कारण त्यासाठी होणारा खर्च हा जनतेकडून वसूल केलेल्या अशा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जमा केलेल्या करांतून केला जातो,         सर्व सभागृहातील रोजच्या कामांच्या तासांत तसेच अधिवेशन काळातील कामांच्या तासांत जर वेळ फुकट म्हणजे वाया जात असेल तर त्याची भरपाई ही त्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या पक्षांकडून संपूर्ण खर्च वसूल करण्यात यावा, उर्वरित भाग दोन मध्ये -
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 9 months ago
सर्वांना सादर प्रणाम🙏 भारतीय जनता पक्ष व त्याचं उद्दिष्ट🙏 भारताचं नांव विश्वात सन्मानजनक उंचीवर नेणे. रसातळातील समस्त जनतेला उज्वल भविष्य देणे. तीर्थ क्षेत्रांसह परिसरांचा उत्तम विकास घडविणे. यथाशक्ती शांततेत राहण्यांस जगाला प्रवृत्त करणे. जनता जनार्दनांस समृद्ध, बुद्धिवान, बलशाली बनविणे. नम्रतेनें ज्येष्ठ, श्रेष्ठ, व्यक्तींच्या विचारांचा आदर करणे. ताकतवर भारतीयांना सुआरोग्यदायी जिवन देणे. पदोपदी विश्वातील गरजूंना अन्न, वस्त्र, निवारा देणे. क्षणोक्षणी जनतेच्या सुरक्षिततेचा विचार जागविणे. जय जवान🙏  जय किसान🙏    जनता महान🙏 जय हिंद🙏     जय महाराष्ट्र🙏    जय श्रीराम🙏 सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास, सर्वांचा एकत्रित सुखानं प्रवास हा एकच ध्यास🙏
mygov_173444734974440911
VINAYAK SHANKARRAO KHARE
VINAYAK SHANKARRAO KHARE 1 year 9 months ago
R/Sir, Citing WHO press release dt 31st may 2011, wherein it is reported that IARC has classified Radio frequency electromagnetic fields as possibly carcinogenic to human (2b), it was requested that, matter may be taken up with WHO for updated guidelines. However no such fresh guidelines are seen or any instructions are issued to mobile manufacturers to ensure stricter control on such emissions. However it is also seen that head phones, which were given earlier as standard accessory is now required to be purchased separately. 1)It is therefore once again requested to take up the matter with WHO for fresh guidelines. 2) Since holding a phone at distance could lower the risk, head phones may be made standard accessory along with mobile phone, till WHO issues fresh guidelines. 3) Mobile manufacturers must be asked to ensure lower emissions of such hazardous radio frequency electromagnetic fields.
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 9 months ago
दानात दान महत्वाचं मतदान! अवश्य करावं नेहमी मतदान!! चला उठा सर्व करा कुटुंबासह मतदान! इतरांसही प्रवृत्त करा करण्यास मतदान!! जागृत ठेवावी आपली स्वतःची मती! योग्य मतदानांन करावी देशाची प्रगती!! पूर्णपणे विचार करून करावं मतदान! समोर ठेवावं आपल्या भविष्याचं भान!! नका फसू छोट्या अन खोट्या आश्वासनांना! सावधानता बाळगावी प्रतिनिधी निवडतांना!! जपा आपल्या भगव्याचा स्वाभिमान! व्हावा विश्वात तिरंग्याचा कायम सन्मान!! विनाकारण करू नका मतदान करण्याचा आळस! एकगठ्ठा मतदान करून चमकवा देशाचा कळस!! नका करू जाती पातीत भेदा भेद! याने तर निर्माण होतात निव्वळ मतभेद!! साधावया आपल्या निर्मळ भविष्याचा वेध! विश्वांत उधळवूया आपल्या देशाचा अश्वमेध!! प्रत्येकानं मिळवावा मतदानाचा मनमुराद आनंद! जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय हिंद!!
mygov_173444728574440911
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 9 months ago
अमूल्य असतं मतदान!! आपलं एक साधं सुधं मत! वाढविते लोकशाहीची पत!! प्रत्येकानं बजावावं आपलं मतदानाचं कर्तव्य! सरकारनं उजळवावं सर्व नागरिकांचं भवितव्य!! कदापी नका घालवू एकही मत फुकट! परिस्थिती निर्माण होऊ शकते बिकट!! आपल्या मतांसाठी दाखवितात हे फुकट, ते फुकट! थोडं देऊन इतर गिळंकृत करण्याचं ओढवेल संकट!! आपलं एक साधं सुधं पण अमूल्य मत! खोटया आश्वासनांनी होऊ शकते फसगत!! जपावं आपल्या साध्या सुध्या एकेका मतांचं गुपीत! निवडून द्यावेत की जे जपतील फक्त जनतेचं हीत!! आपलं एक साधं सुधं मत ठरत असतं धारदार! असावेत नगरसेवक,आमदार,खासदार तडफदार!! आपल्या एकेका मतानं निवडून येतं एक सरकार! मतांचा मान ठेवून नेत्यांनी विकास करावा जोरदार!! आपल्या एकेका मतांचा नेत्यांनी राखावा आदर! स्वतःच्या कर्तृत्वानं जनतेस द्यावी सन्मानाची चादर!! एकेका मतानं विजयी होणाऱ्या नेत्यांनी जनतेला परतावा म्हणून वाटावा आनंदाचा मेवा! मिळावा समस्त नागरिकांना सुखी, समाधानी, सुआरोग्यदायी दिर्घायुष्याचा ठेवा!! आपलं एक साधं सुधं मत म्हणजे देशाचा अभिमान! निवडावेत नेते जे वाढवतील विश्वात तिरंग्याची शान!!
mygov_173444721574440911
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 9 months ago
समस्त सन्माननीय मित्र परिवार सादर नमस्कार🙏 आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की काहीं मंडळी निवडुकीच्या यादीत आपलं नांव नाही असं म्हणतात,     आता हे नांव यांत्रिक, तांत्रिक, मानवी चुकीनं, जाणते पणाने किंवा अजाणते पणाने गायब होते हे आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडले आहे म्हणून आपणांस नम्र विनंती करू इच्छितो की आपण बरेच जणं हाय फाय दर्जाचे मोबाईल व इंटरनेट वापरतो,           प्रत्येकानं EPIC या साईटवर आपलं नांव मतदार यादीत आहे ना याची दरवर्षी खात्री करून घ्यावी, हे करण्यासाठी अगदी चार पाच मिनिटं किंबहूना त्याहून ही कमी वेळ लागतो,       या बरोबरच ज्यांना यातील माहिती नाही त्यांना शिकवावं किंवा त्यांचंही नांव आहे ना याची खात्री करून द्यावी, आपली नांव नसल्यास त्वरित कार्यवाही करून आपापलं नांव मतदार यादीत नोंदवून घ्यावं🙏       आपलं एकेक मत हे आपल्यासह आपली पुढील पिढी आणि देशाचं म्हणजेच सर्वांचंच भवीतव्य ठरविणारं असतं म्हणून स्वतः जागरूक व्हा आणि इतरांनाही सावध करण्याचं देश सेवेसाठी व्रत असं समजून कर्तव्य बजावावं ही पुन्हा एकदा नम्र विनंती करीत आहे 🙏
mygov_173444708274440911
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 9 months ago
बजेट GST संबंधित मागील भागावरून पुढे भाग -2 आता सर्वात उच्चं वर्ग अशा दर्जाच्या श्रीमंत राहणीमान असणाऱ्यांसाठी पुरविल्या जाणाऱ्या सर्व सेवा, प्रवास, मोठं मोठे उद्द्योग यांवर दहा टक्के GST आकारावा,