Abhay Pralhad Vaidya
3 years 5 months ago
सन्माननिय पंतप्रधान साहेब, नमस्कार,
निवडणूक प्रक्रिये संदर्भात
मी आधी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मतदान करण्याच्या बाबतीत ते जेथे कामं करीत असतील तेथे त्यांना मतदान करण्यास पात्र ठरवावं असं लिहून पाठविलं होतं त्यावरच पुढे लिहीत आहे, आता निवडणूक आयोगानं दूरस्थ मतदारांसाठी मतदान करता यावं याबाबतीत पाऊल उचललं आहे ही अभिनंदनीय गोष्ट आहे, येथे मी एक नम्र विनंती करू इच्छितो की याचा वापर प्रथमतः निवडणुकीत कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व्हावा म्हणजे इतकी वर्ष ते मतदान करू न शकल्यामुळे त्यांची मतं फुकट जात होती, आता या कर्मचाऱ्यांच्या मतदानामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल हे व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतर आपल्याला समजेल की त्याचा वापर सुयोग्य प्रकारे होत आहे ही एक प्रकारची रंगीत तालीम ठरेल आणि सर्व राजकीय पक्षांनाही उपयुक्तता जाणवेल, यांवर काही प्रतिक्रिया आल्या तर त्यांवर गरज भासल्यास तज्ञ मंडळीतर्फे अधिक मार्गदर्शन घेऊन बदल करणं आणि परत रंगीत तालीम घेऊन मगच इतर दूरस्थ मतदारांसाठी वापर करावा, साधारणतः मतदान केल्यावर मतदात्यांच्या फक्त एका बोटावर शाई लावली जाते,
उर्वरित भाग दोन मध्ये
Like
(7)
Dislike
(0)
Reply
Report Spam